E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
श्रीमंत...
मोहन हा चौथीतील एक हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची. शाळा सुटल्यावर तो हॉटेलमध्ये कप-बशा धुण्याचे काम करायचा. लोकांचे जुने कपडे तो वापरायचा, त्याचे शाळेचे कपडेही ठिगळं लावलेले होते; पण नेहमी स्वच्छ आणि नेटके असायचे.
एके दिवशी वर्गशिक्षक वर्गात आले आणि म्हणाले, मुलांनो, यंदाच्या स्नेहसंमेलनात आपल्या शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थ्यास आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मला त्या विद्यार्थ्याचे नाव सांगा.
सर, मोहन! संपूर्ण वर्गाने एकमुखाने उत्तर दिले.
ते ऐकून मोहनच्या स्वाभिमानाला ठेच लागली. तो त्वरित उभा राहिला आणि म्हणाला, सर, मी गरीब आहे, हे तुम्ही कशावरून ठरवलं? माझ्या फाटक्या कपड्यांवरून? माझा अभ्यास पहा, माझे अक्षर पहा, गणितातील हिशेब पाहा, पाठांतर पाहा, मैदानी खेळातील माझे कौशल्य पाहा आणि मग ठरवा-मी गरीब कसा?
मोहनच्या ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण शब्दांनी संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला. शिक्षकही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांनी हळूच कागदावर लिहिलेले त्याचे नाव खोडले.
चार दिवसांनी स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. बक्षीस वितरण सुरू झाले. चित्रकला, वक्तृत्व, निबंध लेखन, मैदानी खेळ-या सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी एकच होता-मोहन!
शिक्षकांनी त्याचे नाव मोठ्या अभिमानाने घोषित केले.
मोहन बक्षीस स्वीकारण्यासाठी नम्रपणे व्यासपीठावर गेला. शिक्षकांनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत सांगितले, हा आहे मोहन-आपल्या शाळेतील सर्वात हुशार, नम्र आणि ज्ञानश्रीमंत विद्यार्थी!
-----
तुमचं काम हा तुमच्या आयुष्याचा मोठा भाग भरून काढणार आहे, आणि खरं समाधान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे महान कार्य मानता ते करणे आणि महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्हाला तुमच्या कामावर प्रेम असणे.
जर तुम्हाला अजून ते सापडलं नसेल, तर शोधत राहा. समाधान मानू नका. हृदयाच्या बाबतीत, जेव्हा तुम्हाला योग्य गोष्ट सापडेल, तेव्हा तुम्हाला ते जाणवेल.
-----------
एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून अगदी थकून गेला. शेवटी स्वतःचा राग आवरत तो म्हणाला,
दुकानदार : माफ करा! मी तुम्हाला एकही चांगली साडी दाखवू शकलो नाही.
तेव्हा शांतपणे हसत महिला म्हणाली,
महिला : अहो, काही हरकत नाही... मी तर भाजी घ्यायला चालले होते, पण तुमच्या दुकानात एसी चालू दिसला, म्हणून थोडा वेळ थांबले!
-------------
एप्रिल फुल
आज १ एप्रिल. आजचा दिवस संपूर्ण जगात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. फुल म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. या प्रथेची सुरवात कधी झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत अनेक कथा प्रचलित आहे. एका फ्रेंच कथेनुसार पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरत होते त्या कॅलेंडरप्रमाणे नववर्षाची सुरवात २५ मार्च ते १ एप्रिल या आठवड्यात होत असे. या आठवड्यात सगळे लोक वसंत ऋतूचे स्वागत आणि १ एप्रिलला नववर्ष साजरे करीत असत. मात्र १५८२ सालापासून फ्रेंच लोकांनी ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले. या कॅलेंडरनुसार १ जानेवारीपासून पासून नववर्षाचा प्रारंभ होतो. हा बदल तेथील ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना माहीत नव्हता ते १ एप्रिलाच नववर्ष साजरा करीत. त्यामुळे या लोकांना तेथील उच्चभ्रू, सुशिक्षित लोक मूर्ख म्हणत. जे लोक १ एप्रिलला नववर्ष साजरा करीत त्यांना फ्रान्ससमध्ये एप्रिल फुल असे संबोधले जाई. अशा तर्हेने १ एप्रिलला एप्रिल फुल करण्याची प्रथा जगभर पसरली. फ्रेंच लोक भारतात आल्यानंतर भारतातही ही प्रथा सुरू झाली. १ एप्रिलला आपले मित्र, नातेवाईक यांना एप्रिल फुल करण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. दुसर्यांना एप्रिल फुल बनवताना प्रत्येकाने स्वतःमधील वाईट प्रवृत्तीलाही एप्रिल फुल बनवावे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला लवकर उठून व्यायाम करून एप्रिल फुल करावे. दररोज मोबाईल वापराच्या सवयीला एप्रिल फुल करून एखादे छानसे पुस्तक वाचावे. गरजवंताला मदत करून स्वार्थाला एप्रिलफुल करावे. स्वतःच्या मी पणाला एप्रिलफुल करुन आम्ही बनून समाजात वावरल्यास एकमेकांविषयी असलेली कटुता कमी होईल.
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
----
जर सकाळी लवकर उठल्याने
ताकत, बुद्धि आणि धन वाढते - तर पेपर विक्रेता आणि दूधवाला सर्वात मोठे श्रीमंत असते ! तेव्हा
झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या...
-------------------
माणूस दिसायला इतका खराब नसतो,
जितका तो आधार कार्डावर दिसतो,
अन्...
इतका देखणा ही नसतो जितका तो
व्हॉट्सअपच्या डीपीमधे दिसतो.
माणूस इतका वाईट पण नसतो,
जितका त्याची बायको समजते..
अन्...
इतका चांगला पण नसतो,
जितकी त्याची आई समजते !
पण,
तो नक्की कसा असतो?
हे फक्त त्याच्या मित्रांनाच ठाऊक असते.
---------------
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वंयपाक...
‘काट्याने‘ खातात, तर भारतीय नवरे?
‘मु-काट्याने‘
----------------
कृपया,
एप्रिल फुलचे लांबलचक मेसेज पोस्ट करू नये.
फक्त
‘बायको माझं ऐकते’ इतकंच लिहावे
आम्ही समजून घेऊ.
Related
Articles
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींसाठी सायकल बँक
02 Apr 2025
सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझीची मालकीण
03 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
01 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींसाठी सायकल बँक
02 Apr 2025
सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझीची मालकीण
03 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
01 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींसाठी सायकल बँक
02 Apr 2025
सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझीची मालकीण
03 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
01 Apr 2025
भविष्य निर्वाह निधीची बनावट खाती उघड
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींसाठी सायकल बँक
02 Apr 2025
सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझीची मालकीण
03 Apr 2025
राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा होणार सुरू
02 Apr 2025
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात